Prasad Bhandarkar playing bansuri behind pink flowers

बासरीइतके साधे वाद्य दुसरे कोणते…

मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद.

बांबूचा एक पोकळ तुकडा. त्यावर तापवून पाडलेली काही छिद्रे. बस्स, एवढेच…

माझ्या माहितीत बासरीइतके साधे आणि नैसर्गिक दुसरे कोणतेही वाद्य नाही. तिला सूर जुळवण्याची किंवा फार गुंतागुंतीची निगा राखण्याची गरज नसते.

तरीही एखादा नवशिक्या ती वाजवायला घेतो, तेव्हा ती सहजासहजी साथ देत नाही. बासरीतून चांगला, स्वच्छ सूर काढायला शिकण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. माझे गुरू नेहमी गंमतीने म्हणतात, ‘बासरी हे देवाचे वाद्य आहे आणि देव फक्त खऱ्या भक्तांनाच ते वाजवू देतो.’

भगवान कृष्णाचे हे दिव्य वाद्य समजून घेण्यास मदत करण्याचा या वेबसाइटचा एक नम्र प्रयत्न आहे.