प्रेरणा — हरिजींच्या वर्गातील ध्वनिमुद्रणे

मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद.

माझ्या संग्रहात ही जुनी ध्वनिमुद्रणे सापडली. ती पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या 1989–90 च्या सुमारास झालेल्या वर्गांतील आहेत. नेमकी तारीख माहीत नाही. आठवते त्याप्रमाणे माझ्याबरोबर फ्रान्स्वाझ रोडिटी आणि कॅथरीन पॉटर उपस्थित होत्या.

आवाजाच्या गुणवत्तेबद्दल दिलगीर आहे. ही माझ्या विद्यार्थिदशेतील ध्वनिमुद्रणे आहेत. तेव्हा बासरीच कशीबशी परवडायची; ध्वनिमुद्रणाची सोय असलेला सोनी वॉकमन आणि मायक्रोफोन तर दूरच. फ्रान्स्वाझने ही ध्वनिमुद्रणे उदारपणे मला दिली होती. शिवाय वर्गाची जागा साधीशी, अगदी रस्त्यालगत होती. मागे बेस्टच्या बस, मोटारी आणि रिक्षांचे आवाज ऐकू येतात.

राग यमन

तीनतालातील बंदिश

यूट्यूबवर यमनमधील बंदिश पाहा

जोड

यूट्यूबवर जोड पाहा

झाला

यूट्यूबवर झाला पाहा