राग अनवेल्ड — डीव्हीडी

मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद.

राग अनवेल्ड हा भारतीय शास्त्रीय संगीतावर बनलेला निःसंशय सर्वांत सर्वसमावेशक माहितीपट आहे.

राग अनवेल्ड डीव्हीडी

एका मित्राने त्याची माहिती दिली. बे एरियातील स्थानिक सभागृहात त्याची दोन तासांची लहान आवृत्ती दाखवली होती. वैयक्तिक कारणांमुळे मला जाता आले नाही. पण तो पाहिलेल्या काही संगीतकार मित्रांनी आग्रहाने शिफारस केली. मी डीव्हीडी घेतली आणि इतका प्रभावित झालो की चार तासांहून मोठा संपूर्ण माहितीपट एकाच बैठकीत पाहिला.

राग अनवेल्ड भारतीय शास्त्रीय संगीताकडे—नेमके सांगायचे तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताकडे—अनेक बाजूंनी पाहण्याचा उत्तम प्रयत्न करतो. गेल्या पाच हजारांहून अधिक वर्षांच्या भारतीय संस्कृतीच्या प्रवासात या कलेचा उगम आणि विकास समजावतो. राग, ताल आणि सादरीकरणाच्या शैलींच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करतो. विशेष म्हणजे आजच्या काळातील अत्यंत सिद्धहस्त आणि आदरणीय संगीतकार व संगीतसमीक्षक या गोष्टी सांगतात. तरीही हा माहितीपट विद्यार्थी आणि रसिक, दोघांसाठी आहे.

ही डीव्हीडी संग्रही ठेवावी अशी आहे. मागच्या सप्टेंबरमध्ये घेतल्यापासून मी स्वतः ती अनेकदा पाहिली आहे.

राग अनवेल्डचा ट्रेलर पाहा